America : अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटक संख्येत पाचपट वाढ

America : अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटक संख्येत पाचपट वाढ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: गेल्या चार वर्षांत भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटक संख्येत पाचपट वाढ झाली आहे. २०२४ च्या पहिल्या अकरा महिन्यांत 20 लाखांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेला भेट दिली. २०२३ च्या याच कालावधीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी अधिक आहे, असे भारतातील अमेरिकन दूतावास व वाणिज्य दूतांनी एका निवेदनात सांगितले आहे.

दुसऱ्या वर्षीही अमेरिकेकडून भारतीयांसाठी १० लाखांहून अधिक नॉन-इमिग्रंट व्हिसा जारी

पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवास करण्याच्या वाढत्या मागणीचे हे मोठे उदाहरण आहे. सुमारे पन्नास लाख भारतीयांकडे आधीच अमेरिकेचा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे.दररोज मिशनद्वारे हजारो नवीन व्हिसा जारी केले जातात,” असे दूतावासाने स्पष्ट केले.

यावर्षी अमेरिकेतील एच-१बी व्हिसा नूतनीकरणासाठी एक यशस्वी पायलट प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामुळे भारतातील अनेक विशेष क्षेत्रातील कामगारांना अमेरिकेबाहेर न जाता व्हिसा नूतनीकरणाची सोय झाली. या प्रक्रियेने हजारो अर्जदारांचे काम सोपे झाले असून, २०२५ पासून औपचारिकपणे अमेरिका-आधारित नूतनीकरण प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.

दूतावासाने स्पष्ट केले की, “भारतातील अमेरिकन मिशनने हजारो इमिग्रंट व्हिसा जारी केले. ज्यामुळे कौटुंबिक पुनर्मिलन व कुशल व्यावसायिकांचे स्थलांतर सुलभ झाले. हे व्हिसा धारक अमेरिकेत पोहोचताच कायमस्वरूपी रहिवासी झाले.

अमेरिकन विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठीही भारतीयांचा उच्चांक नोंदवला गेला आहे. दूतावासाने म्हटले आहे की, “जे-१ नॉन-इमिग्रंट व्हिसा धारकांना आता दोन वर्षे मायदेशी परतण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे त्यांना करिअर आणि शिक्षणाच्या संधी वाढवता येतील.”

अमेरिकन नागरिकांसाठी २४,००० पेक्षा जास्त पासपोर्ट आणि इतर काउंसुलर सेवा पुरवल्या गेल्या. तसेच, नॉन-इमिग्रंट व्हिसा नूतनीकरणासाठी मुलाखतीशिवाय अर्जदारांसाठी जलद प्रक्रिया करून काम सोपे करण्यात आले आहे. यामुळे अर्जदारांच्या प्रतीक्षा कालावधी कमी होऊन प्रक्रियेचा वेग वाढला आहे.

A five time increase in the number of tourists going to America

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023