विशेष प्रतिनिधी
वॉशिंगटन : Donald Trump इराणने करार मान्य न केल्यास त्यांचे पावर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त केले जातील. आता कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही,” असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.Donald Trump
ट्रम्प म्हणाले की, “शांतता करार करण्यासाठी इराणकडे असलेली ही शेवटची संधी आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेली चूक आपण पुन्हा करणार नाही. ओबामा प्रशासनाने 2015 मध्ये इराणसोबत एक अणुकरार केला होता. जर इराणने या करारावर स्वाक्षरी केली नाही, तर संपूर्ण देश नष्ट होईल.” असे ते म्हणाले. तसेच, “इराणने होर्मुझ सामुद्रधूनी परिसरात फ्रान्स आणि युनायटेड किंगडमशी संबंधित जहाजांवर गोळीबार केला. हे युद्धविराम कराराचे पूर्ण उल्लंघन आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करण्यास तयार आहोत.Donald Trump
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनीदेखील अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. “ट्रम्प असा दावा करतात की इराण आपल्या अणुविषयक अधिकारांचा वापर करू शकत नाही. पण, कोणत्या आधारावर ते असे म्हणतात, हे स्पष्ट करण्यात ते अपयशी ठरतात. एखाद्या राष्ट्राला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवणारे ते कोण आहेत?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. इराणला युद्ध नको असून, आपण फक्त आत्मसंरक्षणासाठी पावले उचलत आहोत, असे पेझेशकियान यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आणि अशा कृत्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे संबोधले.
इराणने चर्चेसाठी पाकिस्तानात शिष्टमंडळ पाठवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘अल जझीरा’च्या वृत्तानुसार, अमेरिकेची नौदल नाकेबंदी जोपर्यंत लागू राहील, तोपर्यंत वाटाघाटी पुढे सरकणार नाहीत, असे इराणने स्पष्ट केले आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी घोषणा केली आहे की, इराणसोबतच्या वाटाघाटी या आठवड्यात पुन्हा सुरू होतील. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे सोमवारी (20 एप्रिल) पाकिस्तानात दाखल होतील.
Accept deal or face destruction of power plants, bridges: Donald Trump warns Iran
महत्वाच्या बातम्या