विशेष प्रतिनिधी
नामरूप (आसाम) : बांगलादेशातील बेकायदा घुसखोरांना आसाममध्ये वसवण्यामागे थेट काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान Narendra Modi यांनी केला. दिब्रूगड जिल्ह्यातील नामरूप येथे १०,६०१ कोटी रुपयांच्या खत कारखान्याच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीरसभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर देशविरोधी कृत्यांचा आरोप केला. Narendra Modi
मोदी म्हणाले, काँग्रेसचे उद्दिष्ट फक्त मतपेटी मजबूत करणे आहे. जनतेच्या सुरक्षेची, आसामच्या जमिनीची आणि ओळखीची त्यांना पर्वा नाही. बांगलादेशातील घुसखोरांना आसामच्या जंगलात आणि जमिनीवर वसवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळेच मतदार यादींच्या पुनर्विलोकनाला काँग्रेस विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विकासाचे लाभ थेट गरीबांपर्यंत
देश तेव्हाच पुढे जाईल जेव्हा शेतकरी समृद्ध होतील, असे सांगत मोदींनी भाजप सरकारच्या शेतकरीकल्याण योजनांचा उल्लेख केला. ईशान्य भारताचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचला असून आमच्या प्रयत्नांमुळे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
आसामी ओळख, जमीन आणि अभिमानाचे संरक्षण
काँग्रेसने जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण केले नाही, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत, असा आरोप करत मोदींनी भाजप सरकार आसामी लोकांची ओळख, जमीन, अभिमान आणि अस्तित्वाचे संरक्षण करेल, असे ठाम आश्वासन दिले.
भूपेन हजारिका यांना ‘भारत रत्न’ देताना काँग्रेसने विरोध केला, तो आसामच्या जनतेचा अपमान असल्याचे मोदी म्हणाले. भाजप सरकारचे उद्दिष्ट आसामला ऐतिहासिक ‘अहोम’ राजवंशासारखे सामर्थ्यवान बनवण्याचे असून औद्योगिकीकरण आणि दळणवळणामुळे राज्याची स्वप्ने पूर्ण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकरी कल्याणासाठी खतांचा सतत पुरवठा गरजेचा असल्याचे सांगत मोदींनी नव्या युरिया कारखान्याचे महत्त्व स्पष्ट केले. वार्षिक १२.७ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प पुरवठा साखळी मजबूत करेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देईल, असे त्यांनी नमूद केले.
एकूणच, काँग्रेसवर घणाघाती टीका करताना मोदींनी विकास, सुरक्षा आणि राष्ट्रीय हित या मुद्द्यांवर भाजप सरकारची भूमिका ठामपणे मांडली.
Congress Settled Bangladeshi Infiltrators for Vote Bank Politics, Alleges PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा!’ १७ पैकी १० नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीची बाजी
- मुश्रीफ – घाटगे जोडीची कागलमध्ये कमाल, 23 पैकी 23 जागा जिंकत एकहाती सत्ता
- Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का, शिर्डीत विखे पाटलांची सत्ता