विशेष प्रतिनिधी
नाशिक : Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसला असून भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे विजयी झाल्या असून, भाजपचे कैलास घुले यांचा १८०० मतांनी दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ, भाजपचे सात आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत .Girish Mahajan
त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ मेळा डोळ्यासमोर ठेवून शहराचे प्रथम नागरिकपद आपल्याकडेच कसे राहील, यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने पूर्णता प्रतिष्ठा पणाला लावली होती. नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षीय उमेदवारांसह आठ उमेदवार रिंगणात होते.Girish Mahajan
शिर्डी नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत भाजप-महायुतीच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी लोकक्रांती सेना पॅनलच्या डॉ. कल्याणी आरणे यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ज्यामध्ये त्यांनी आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे राखला आहे.
नगरसेवक पदाच्या निकालांमध्येही महायुतीने मोठी मुसंडी मारली असून, तीन अपक्ष उमेदवार वगळता उर्वरित सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे शिर्डी नगरपरिषदेवर आता भाजप आणि मित्रपक्षांची एकहाती सत्ता आली आहे.
Setback for Minister Girish Mahajan in Trimbakeshwar Council, Vikhe Patil Retains Power in Shirdi
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi : मनरेगावर मोदी सरकारचा बुलडोजर, सोनिया गांधी यांची टीका
- धर्माबाद शहरात तणाव, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
- पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
- Vijay Vadettiwar : विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, निवडणूक आयोगाला म्हणाले नालायक