Fighter Jet : अमेरिकेचे फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा. बचाव ताफ्यावरही हल्ला

विशेष प्रतिनिधी

तेहरान: Fighter Jet  इराणच्या हवाई हद्दीत घुसखोरी करणारे अमेरिकेचे अत्याधुनिक F-15 Eagle फायटर जेट इराणी लष्कराने पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. ही कारवाई इस्लामिक रेवोल्युशनरी गार्डने (IRGC) प्रगत एअर डिफेन्स सिस्टमच्या सहाय्याने केल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,Fighter Jet

या घटनेनंतर अमेरिकेने संबंधित वैमानिकाला वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवली. यासाठी C-130 मालवाहू विमान आणि Black Hawk हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, इराणने ही कारवाईही घुसखोरी मानून प्रत्युत्तर दिले आणि काही हेलिकॉप्टर्स पाडल्याचेही म्हटले आहे.Fighter Jet



इराणी वृत्तसंस्था ‘तस्नीम’नुसार, फायटर जेट लक्ष्य केल्यानंतर वैमानिकाने इजेक्ट केले होते आणि तो इराणच्या भूमीवर उतरला. मात्र, त्याच्या स्थितीबाबत संभ्रम आहे. काही अहवालांनुसार, वैमानिक जिवंत पकडला गेला असून तो इराणच्या ताब्यात आहे, तर इतर सरकारी माध्यमांनी त्याच्या मृत्यूची शक्यता वर्तवली आहे.

इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हे अमेरिकेचे F-35 जेट असल्याचा दावा केला होता. मात्र, काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते हे F-15E प्रकारचे विमान असण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून अद्याप या घटनेची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

आधीच्या घटनांशी साधर्म्य

१९ मार्च रोजीही इराणने अमेरिकन F-35 जेटला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. त्या वेळी विमानाचे नुकसान झाले, मात्र वैमानिक सुरक्षित राहिला होता, असे काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले होते. ताज्या घटनेत मात्र इराणने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

इराणने आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायलचे १२५ हून अधिक ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली तरी, यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.
या घटनांमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव, त्यात इराणचा वाढता आक्रमक पवित्रा, यामुळे मोठ्या संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Iran Claims Downing of US Fighter Jet, Attacks Rescue Mission

महत्वाच्या बातम्या