आपला फुटीचा दणका, राजसभेतील दोन-तृतीयांश खासदारांचा भाजप प्रवेश; राघव चड्ढा यांची मोठी घोषणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला मोठा धक्का देत राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदारांनी भारतीय जनता पक्षात विलय करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी केली. खासदार संदीप पाठक आणि अशाेक मित्तल यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. Raghav Chadha

दिल्लीच्या राजकारणात आज मोठा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ‘आम आदमी पक्षा’चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत पक्षापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी खा. संदीप पाठक आणि खा. अशोक मित्तल यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी राघव चढ्ढा यांनी पक्षावर आपल्या मूळ मूल्यांपासून पूर्णपणे भरकटल्याचा आरोप केला.



चड्ढा म्हणाले, “आम्ही राज्यसभेतील आपचे दोन-तृतीयांश सदस्य म्हणून भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी सांगितले की, या निर्णयात हरभजन सिंग राजेंद्र गुप्ताल, विक्रम सहानी आणि स्वती मालीवाल यांचाही समावेश आहे.

आपच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या चड्ढा यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना म्हटले, “ज्या पक्षासाठी मी १५ वर्षे दिली, तो पक्ष आता आपल्या मूळ तत्वांपासून दूर गेला आहे. देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मला वाटत होते की मी चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे आज मी आपपासून दूर जात असून जनतेच्या अधिक जवळ जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, अशाेक मित्तल यांनी यापूर्वी चड्ढा यांची राज्यसभेतील उपनेतेपदावरून झालेली बदली “नियमित प्रक्रिया” असल्याचे म्हटले होते. मात्र या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

MPs in the Rajya Sabha will join the BJP; Raghav Chadha’s big announcement

महत्वाच्या बातम्या