Nishikant Dubey : आदित्य ठाकरेंनी हिरोईनला मारल्याचा निशिकांत दुबेंचा लोकसभेत आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Nishikant Dubey जर सेंगर आणि ब्रिजभूषण यांचा दाखला दिला जाणार असेल, तर आम्हाला आदित्य ठाकरेंबद्दलही बोलावे लागेल. कारण, आदित्यनेही हिरोईनला मारले, आम्ही त्याची चर्चा करू इच्छितो” असा थेट आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केलास. या विधानामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेत, “जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे. निशिकांत दुबेंवर कारवाई व्हायला पाहिजे,” अशी मागणी केली.Nishikant Dubey

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर (नारी शक्ती वंदन विधेयक) चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैयक्तिक आरोपांची मोठी चकमक उडाली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केल्याने शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रचंड संतापले.Nishikant Dubey



अरविंद सावंत यांनी कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचे आहेत ते विसरु नका. बृजभूषण सिंह महिला सन्मान करणारे आहेत का?”, असा सवाल केला. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे विरोध करु लागले. त्यावर अरविंद सावंत यांनी सवाल केले की, “तुम्हाला बलात्कारी जास्त प्रिय आहेत का? त्याचे नाव येऊ द्या रेकॉर्डवर.” अरविंद सावंतांच्या टीकेला उत्तर देताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. “जर सेंगर आणि ब्रिजभूषण यांचा दाखला दिला जाणार असेल, तर आम्हाला आदित्य ठाकरेंबद्दलही बोलावे लागेल. कारण, आदित्यनेही हिरोईनला मारले, आम्ही त्याची चर्चा करू इच्छितो” असे निशिकांत दुबे म्हणाले.

निशिकांत दुबेंच्या विधानाने संतापलेल्या अरविंद सावंतांनी नाव न घेता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या प्रकरणांकडे इशारा केला. ते म्हणाले, “आम्ही जर तोंड उघडले तर सगळंच बाहेर येईल, मग गोध्रा देखील येईल. मी केवळ तुरुंगात गेलेल्या गुन्हेगारांची नावे घेतली आहेत. मला जर बदनाम करायचे असते, तर मी ‘तडीपार’ कोण होतं त्यांचं नाव घेऊ का? एपस्टीन फाईल्सचे नाव घेऊ का? मला सांगाना. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. लाईन आहे. त्यांनी माफी मागावी.”

Nishikant Dubey alleges Aditya Thackeray assaulted actress

महत्वाच्या बातम्या