विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…, अशी जहरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी निकटचे संबंध असल्याचे आरोप झाल्याने रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले आहे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.
'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… #Maharashtra #Politics
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 28, 2026
हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते.
दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, चाकणकरने राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे,भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद मा. सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी हया पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज मा. अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत
Personal Reasons’ to a 2-Line Exit: Rohini Khadse Targets Rupali Chakankar Over Resignation
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर