West Bengal : पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट?पाच राज्यांच्या एक्झिट पोलमध्ये चुरशीचे संकेत

नवी दिल्ली: West Bengal  पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज समोर आले असून, बहुतांश ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट टक्कर असल्याचे संकेत आहेत. याठिकाणी झालेल्या विक्रमी मतदानामुळे सत्तापालट होऊ शकतो असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.West Bengal

पीपल्स पल्स’च्या अंदाजानुसार टीएमसीला १७७ ते १८७ जागा मिळू शकतात, तर भाजपला ९५ ते ११० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र ‘मॅट्रिझ’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यांना १४६ ते १६१ जागा मिळतील, तर टीएमसी १२५ ते १४० जागांवर मर्यादित राहील, असे भाकीत आहे.West Bengal



 

‘प्रजा पोल’ने तर भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज देत १७७ जागा मिळतील असे म्हटले आहे, तर टीएमसीला सुमारे १०० जागा मिळण्याची शक्यता दर्शवली आहे. ‘पी-मार्क’च्या अंदाजानुसार भाजप १५० ते १७५ जागा जिंकेल, तर टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळू शकतात.
दरम्यान, आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता ‘अॅक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलने वर्तवली आहे. या अंदाजानुसार एनडीएला ८८ ते १०० जागा मिळतील, तर काँग्रेसला २४ ते ३६ जागांवर समाधान मानावे लागेल.

केरळमध्ये मात्र अत्यंत अटीतटीची लढत दिसत असून ‘व्होट वाइब’च्या अंदाजानुसार युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ला ७० ते ८० जागा मिळू शकतात, तर सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट ला ५८ ते ६८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्व पाच राज्यांमध्ये ३ ते १२ टक्क्यांपर्यंत मतदान वाढले आहे. मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेमुळे डुप्लिकेट आणि मृत मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यामुळे एकूण मतदारसंख्या कमी झाली असली तरी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी राहिल्याने टक्केवारी वाढली.

विशेष म्हणजे, महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग घेतला. रोख मदत, मोफत प्रवास आणि आरक्षणासारख्या आश्वासनांचा त्यावर प्रभाव दिसून आला. बंगाल आणि तामिळनाडूमध्ये महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा २ टक्क्यांनी जास्त, आसाममध्ये १ टक्का, केरळमध्ये ५ टक्के आणि पुद्दुचेरीमध्ये ३ टक्क्यांनी अधिक नोंदवले गेले.

एक्झिट पोलमध्ये मोठी तफावत दिसत असल्याने अंतिम निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे. काही अंदाजांमध्ये टीएमसीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असले, तर काहींमध्ये भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये खरी लढत मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Power shift in West Bengal? Exit polls signal tight contests across five states

महत्वाच्या बातम्या