विशेष प्रतिनिधी
काेलकत्ता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर शनिवारी बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी करत आहेत. त्यांचे समर्थक डोक्यावर विटा घेऊन बांधकाम स्थळाकडे निघू लागले आहेत. बाबरी मशीदीचे पतन झाले त्याच दिवशी हा कार्यक्रम आयाेजित करून धार्मिक भावना भडकावण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे. Babri Masjid
बेलडांगासह आसपासचा परिसर आज हाय अलर्टवर आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी मशीद बांधकामावर बंदी घालण्यास नकार दिला होता. न्यायालयाने म्हटले कीकार्यक्रमादरम्यान शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने बेलडांगा आणि राणीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणि आसपास सेंट्रल आर्म्ड फोर्सच्या १९ तुकड्या, रॅपिड ॲक्शन फोर्स, बीएसएफ, स्थानिक पोलिसांच्या अनेक तुकड्यांसह ३ हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शुक्रवारी प्रशासनाने आमदार हुमायूं कबीर यांच्या टीमसोबत बैठक घेतली होती. कबीर म्हणाले की, ते शनिवारी बाबरी मशिदीची कोनशिला ठेवतील. संपूर्ण कार्यक्रम प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसारच केला जाईल. हुमायूंनी सांगितले की, कार्यक्रमात सौदी अरेबियातून धार्मिक नेते येत आहेत. 25 बिघा जागेत कार्यक्रम होणार आहे. 150 फूट लांब आणि 80 फूट रुंद स्टेज तयार करण्यात आला आहे. 400 हून अधिक लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 3 लाखांहून अधिक लोक यात जमतील.
कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी 60 हजारांहून अधिक बिर्याणी पॅकेट तयार करण्यात आले आहेत. 3 हजारांहून अधिक स्वयंसेवक व्यवस्था सांभाळतील. कार्यक्रमाचे ठिकाण NH-12 जवळ आहे. वाहतूक व्यवस्था बिघडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी कबीर यांनी केलेल्या घोषणेबाबत सरकारला कठोर निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी स्पष्ट केले की, हे सर्व सांप्रदायिक भावना भडकवण्याचे षडयंत्र आहे. याला परवानगी दिली जाणार नाही. हुमायूँ कबीर यांनी मात्र धमकीवजा इशारा देत म्हटले की, जर प्रशासनाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येईल.
राज्यपाल बोस म्हणाले की, “सांप्रदायिक भावना भडकवल्या तर संविधान आणि राज्य फक्त बघ्यांची भूमिका निभावणार नाही. कायदा मोडणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील लोकसंख्यात्मक असंतुलन त्याचबरोबर ‘बाबरी’सारखी रचना उभारणे हे षडयंत्र असल्याचे संकेत आहेत. बंगालमध्ये हिंसा आणि भ्रष्टाचार हे दोन कर्करोगाची लक्षणे असून, ते मुळापासून संपवण्याची खरी गरज आहे.”
६ डिसेंबर हा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. कारण १९९२ मध्ये याच दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. ‘टीएमसी’ हा दिवस ‘संघर्ष दिवस’ म्हणून पाळते. यावर्षी राज्य सरकारने ६ डिसेंबरला सार्वजनिक सुटीही जाहीर केली आहे.
Preparations for laying the foundation of Babri Masjid in West Bengal, a plot to incite religious sentiments
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध