राहुल गांधी यांनी पुन्हा केली परदेशात भारताची बदनामी, संघावर झाडल्या दुगाण्या

विशेष प्रतिनिधी

बर्लिन :लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशात जाऊन भारताची बदनामी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी दुगाण्या झाडल्या. संघावर विखारी टीका केली. राहुल गांधी ५ दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी ओव्हरसीज इंडियन काँग्रेसच्या ‘कनेक्टिंग कल्चर्स’ या कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित केले. Rahul Gandhi

बर्लिनमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आरएसएस प्रमुख उघडपणे म्हणत आहेत की सत्याला काही महत्त्व नाही, शक्ती महत्त्वाची आहे. हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे.आपली संपूर्ण संस्कृती सत्यावर आधारित आहे. तुम्ही कोणताही धर्म पाहिलात तरी, ते मूलतः हेच सांगतात की सत्याचे पालन करा. काँग्रेस, महात्मा गांधी आणि तुम्ही सर्व, आम्ही भारताच्या सत्याचे रक्षण करतो. आरएसएस असे करत नाही.
त्यांनी जर्मन थिंक-टँकमधील नेत्यांशी संवाद साधला आणि हर्टी स्कूलमध्येही भाषण दिले. हर्टी स्कूलमध्ये राहुल गांधी म्हणाले की, लोकशाही केवळ सरकारची एक व्यवस्था नाही, तर ती जबाबदारी आहे. संरचनात्मक असमानता दूर करण्यासाठी मजबूत जागतिक सहकार्याची गरज आहे.



कनेक्टिंग कल्चर्स कार्यक्रमात ते म्हणाले की, काँग्रेस सत्यासोबत उभी आहे. भारताच्या सत्याचे रक्षण करते. भारताची संस्कृती सत्यावर आधारित आहे आणि हाच विविध धर्मांचा मूळ संदेश आहे.

राहुल गांधींनी जर्मनीचे माजी चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत दुपारचे जेवण केले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक मुद्दे, व्यापार आणि भारत-जर्मनी संबंधांवर चर्चा झाली.

Rahul Gandhi Again Targets India Abroad, Launches Sharp Attack on RSS

महत्वाच्या बातम्या