West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : West Bengal देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 साठी मतदानाचा पहिला टप्पा हा गुरुवारी (23 एप्रिल) पार पाडला. यावेळी, या निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. बंगालमध्ये 294 पैकी 152 जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात 91.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर तामिळनाडूमध्येही गुरुवारी सर्व 234 जागांवर विक्रमी 84.61 टक्के मतदान झाले असून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मतदान झाल्याचे समोर आले आहे.West Bengal

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 91.46 टक्के आणि तामिळनाडूमध्ये 84.61 टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यांच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान आहे. निवडणूक आयोगाची आकडेवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची असून यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याआधी 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाल्याचे समोर आले होते. आसाममध्ये 85.91 टक्क्यांसह इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, पुदुचेरीमध्ये 90 टक्के आणि केरळमध्ये 1987नंतरचे सर्वाधिक 78.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जाणार आहे.West Bengal



मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावर म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोग दोन्ही राज्यांतील प्रत्येक मतदाराला सलाम करतो.” तसेच, मतदानानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालच्या जनतेने SIRच्या विरोधात प्रचंड बहुमताने मतदान केले आहे. तर, गृहमंत्री अमित शहांनी तृणमूल काँग्रेसचा सूर्य मावळला आहे.

पश्चिम बंगालमधील दक्षिण मिदनापूर येथील कुमारगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, सुवेंदू आपल्या सुरक्षा रक्षकासह हल्ल्यातून वाचण्यासाठी पळत आहेत. बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवरही हल्ला झाला. गाडीची मागची काच फोडण्यात आली. अग्निमित्रा यांनी सांगितले की, मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. बंगालमधील इतर अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. बीरभूमच्या बोधपूर गावात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने लोकांनी पोलिस आणि केंद्रीय दलांवर दगडफेक केल्याचे समोर आले.

Record voter turnout in West Bengal assembly elections

महत्वाच्या बातम्या