विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीन खासगी सदस्य विधेयकं सादर केली. एका विधेयकात वैवाहिक बलात्काराला गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. Shashi Tharoor
थरूर यांनी वैवाहिक बलात्काराबाबत म्हटले की, “लग्न कोणत्याही प्रकारे हिंसेचा परवाना नाही. पत्नीची संमती प्रत्येक परिस्थितीत आवश्यक आहे. थरूर यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील ती तरतूद रद्द करण्याची मागणी केली आहे, ज्यात असा अपवाद आहे की जर पत्नी 18 वर्षांवरील असेल तर पतीचे संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा मानले जाणार नाही. थरूर यांनी याला “जुनी आणि पितृसत्ताक विचारसरणी” असे संबोधत म्हटले की, हा कायदा विवाहित महिलांच्या हक्कांना कमकुवत करतो.
शशी थरूर यांनी X वर लिहिले, “नाही म्हणजे नाहीच. लग्न कोणत्याही महिलेचे स्वातंत्र्य किंवा तिची सुरक्षा हिरावून घेऊ शकत नाही. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे ही हिंसा आहे, मग नाते कोणतेही असो.” एखाद्या महिलेच्या कपड्यांवरून, तिच्या व्यवसायावरून, जातीवरून किंवा तिच्या मागील कोणत्याही गोष्टीवरून संमती गृहीत धरणे केवळ चुकीचे नाही, तर तिच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन देखील आहे.
थरूर यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील ती तरतूद रद्द करण्याची मागणी केली आहे, ज्यात असा अपवाद आहे की जर पत्नी 18 वर्षांवरील असेल तर पतीचे संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा मानले जाणार नाही. थरूर यांनी याला “जुनी आणि पितृसत्ताक विचारसरणी” असे संबोधत म्हटले की, हा कायदा विवाहित महिलांच्या हक्कांना कमकुवत करतो.
शशी थरूर यांनी X वर लिहिले, “नाही म्हणजे नाहीच. लग्न कोणत्याही महिलेचे स्वातंत्र्य किंवा तिची सुरक्षा हिरावून घेऊ शकत नाही. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे ही हिंसा आहे, मग नाते कोणतेही असो.” एखाद्या महिलेच्या कपड्यांवरून, तिच्या व्यवसायावरून, जातीवरून किंवा तिच्या मागील कोणत्याही गोष्टीवरून संमती गृहीत धरणे केवळ चुकीचे नाही, तर तिच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन देखील आहे.
Shashi Tharoor Tables Bills in Lok Sabha, Calls for Criminalising Marital Rape
महत्वाच्या बातम्या