Kejriwal : ‘शीश महल पार्ट २’ वाद पेटला; केजरीवाल नव्या घरात, भाजप आणि राघव चड्ढांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Kejriwal  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोधी इस्टेटमधील नव्या अधिकृत निवासस्थानी राहायला गेल्यानंतर अवघ्या एका दिवसात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि नुकतेच आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले खासदार राघव चढ्ढा यांनी केजरीवाल यांच्यावर “शीश महल पार्ट २” उभारल्याचा आरोप केला आहे.Kejriwal

केजरीवाल यांना केंद्र सरकारकडून लोधी इस्टेटमधील टाइप VIII श्रेणीतील बंगला देण्यात आला आहे. या बंगल्याच्या आलिशान सजावटीचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. भाजपचा आरोप आहे की, या बंगल्यावर करण्यात आलेला खर्च अत्यंत जास्त असून तो सामान्य निकषांपेक्षा अधिक आहे.Kejriwal



दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री परवेश साहिब सिंह यांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.

“अण्णा आंदोलनाच्या नावाखाली सत्तेत आलेले केजरीवाल आता चैनीचे जीवन जगत आहेत. ‘शीश महल’चा इतिहास अजून संपलेला नाही आणि आता ‘शीश महल पार्ट २’ समोर आला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले की,

“दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या पराभवामागील प्रमुख कारणांपैकी ‘शीश महल’ हे एक होते. आता पुन्हा तसाच प्रकार दिसत आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करायला हवे.”

या आरोपांवर आम आदमी पक्ष ने प्रत्युत्तर देताना सांगितले की, भाजपने दाखवलेले फोटो बनावट आहेत आणि ते Pinterest वरून घेतलेले आहेत. बंगल्याच्या सजावटीबाबत केलेले सर्व दावे दिशाभूल करणारे असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.

याआधी ६, फ्लॅगस्टाफ रोड येथील अधिकृत निवासस्थानाच्या सुशोभीकरणावर झालेल्या खर्चामुळे केजरीवाल सरकारवर टीका झाली होती. त्या प्रकरणालाच विरोधकांनी “शीश महल” असे नाव दिले होते.

राजकीय तापमान वाढले

नव्या बंगल्याच्या वादामुळे दिल्लीतील राजकारण पुन्हा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणाचा आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘Sheesh mahal 2’ row erupts as Kejriwal moves into new residence

महत्वाच्या बातम्या