विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : amit shah “विरोधकांकडून तीनही विधेयकांबाबत भ्रम पसरवला जात आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे दक्षिणेतील राज्यांची शक्ती कमी होणार असल्याचा भ्रमही निर्माण केला जात आहे. पण या विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यांची ताकद आणखी वाढणार आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांसारख्या राज्यांच्या जागा कमी होणार नाही,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.amit shah
महिला आरक्षणावरील लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधकांनी महिला आरक्षणाला सहमती दर्शवली पण परिसीमन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर चर्चा केल्यानंतर विरोधकांनी अनेक सवाल या विधेयकाबाबत उपस्थित केले.amit shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यावेळी सांगितले की, “कर्नाटकमध्ये 28 जागा असून हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कर्नाटकच्या जागांची संख्या 42 होणार आहे, तर टक्केवारी 5.14 टक्के होईल. आंध्र प्रदेशमध्ये सध्या 25 जागा असून हे प्रमाण 4.60 टक्के आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर ही संख्या 38 होईल. तेलंगणामध्ये 17 जागा असून हे प्रमाण 3.13 टक्के आहे. ही संख्या नंतर 26 होईल. तमिळनाडूमध्ये 39 खासदार असून हे प्रमाण 7.18 टक्के आहे. ही संख्या 59 होईल. नव्या सभागृहात हे प्रमाण 7.23 टक्के असेल. केरळमध्ये 20 खासदार असून ते 3.68 टक्के दर्शवतात. ही संख्या वाढून 30 खासदार होईल.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारला जात जनगणना करायची नाही. हे सुद्धा खोटं आहे. जनगणना दोन भागांत केली जाते. प्रथम, घरे ओळखली जातात. त्यानंतर, रहिवाशांची चौकशी केली जाते. सध्या घरांसाठी जात-आधारित वर्गीकरण नाही, त्यामुळे ते केले जात नाही. 850 हा आकडा कुठून आला, हे मी स्पष्ट करतो. समजा 100 जागा आहेत, ज्यासाठी 33 टक्के आरक्षण द्यायचे आहे, तर त्यात 50 जागा मिळवल्यास एकूण संख्या 150 होते. 850 हा एक अंदाजे आकडा आहे. मी हे उद्या सविस्तरपणे समजावून सांगेन.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Southern states won’t lose seats, amit shah clarifies
महत्वाच्या बातम्या