शिवसेना शिंदे गटात “फूट”? आमदार महेश शिंदे शंभूराज देसाईंवर बरसले…

विशेष प्रतिनिधी

सातारा: राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळुन आला आहे.साताऱ्यातून शिवसेना गटातून अंतर्गत मतभेद उघड झाले असून, ‘ शिवसेना शिंदे गटात फूट?’ अशी त्यांचा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आपले नाराजी उघड करून, मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे.माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, ‘ शंभूराज देसाई मला अगदी सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमांना मला आमंत्रित केले जात नाही. महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावेळी मला निमंत्रण देण्यात आले नाही,असा गंभीर आरोप त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केला.तर ‘ हा पहिला प्रसंग नाही.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत ‘. असे स्पष्ट करत त्यांनी पक्षात देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

यासोबतच त्यांनी जिल्ह्यातील संघटन स्थितीवर देखील ताशेरे ओढले. जिल्ह्यात खरे शिवसैनिक आहेत तरी कुठे?असा प्रश्न उपस्थित करून महेश शिंदे यांनी पक्षाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांवर टीका केली.



महेश शिंदे पुढे म्हणाले की, “माझ्या पत्नी प्रिया शिंदे शिवसेनेतून निवडून आलेल्या असतील तरी भाजपाच्या पाठिंब्यावर अध्यक्ष झाल्या”. असे सांगताना त्यांनी आपण अगोदरपासूनच भारतीय जनता पक्षाचे काम केल्याचे उघड उघड मान्य केले.

शंभूराज देसाई यांच्यावर आरोप करत शिंदे म्हणाले की, ‘ पाच वर्ष पालकमंत्रीपद असूनही संघटनात्मक ताकद वाढवण्यात अपयश आले ‘.

एकूणच आमदार महेश शिंदे यांचा वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातीला अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे,त्यामुळे शिवसेना शिंदे गटात फूट पडलीये का?अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

“Split” in Shiv Sena Shinde faction? MLA Mahesh Shinde lashed out at Shambhuraje Desai…

 

महत्वाच्या बातम्या