विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात कार्डिनल आणि बिशपसहित ख्रिस्ती समुदायातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत.भारतातील कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात पंतप्रधान अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील.
पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ची स्थापना 1944 साली झाली असून, हे भारतातील कॅथलिक समाजासोबत काम करणारी संस्था आहे.
The Prime Minister will interact with leading leaders of the Christian community, including cardinals and bishops
महत्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
- Parliament : संसदेतील गोंधळाच्या तपासासाठी सात सदस्यीय एसआयटीची स्थापना
- मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक
- Devendra fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस