PM Narendra Modi : महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिलांनी धडा शिकवला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्ला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: PM Narendra Modi महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिलांनी धडा शिकवला असून महिला सक्षमीकरणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.PM Narendra Modi

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत महिला शक्तीवर विशेष भर दिला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिलांनीच योग्य उत्तर दिले, असे सांगत त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.PM Narendra Modi

मोदी म्हणाले की, देशातील महिलांनी आता राजकारणात निर्णायक भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. “महिला शक्ती हा भारताच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. काही पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांनीच त्यांना धडा शिकवला,” असे त्यांनी नमूद केले.PM Narendra Modi



तसेच त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की, महिला सक्षमीकरणाला विरोध करणाऱ्या पक्षांना आता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. “टीएमसी, डीएमके तसेच समाजवादी पक्षांना महिलांनीच योग्य उत्तर दिले आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी मोदी यांनी देशातील राजकारण बदलत असल्याचा दावा करत, जनतेला विकास आणि एकतेचे राजकारण हवे असल्याचे सांगितले. “भारताला संघर्ष नको, विकास हवा आहे; विभाजन नको, एकता हवी आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

भाजपच्या विजयाबद्दल बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि हा विजय लोकशाही व जनतेच्या विश्वासाचा असल्याचे म्हटले. “भाजपचा मंत्र ‘नागरिक देवो भव’ आहे आणि आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मोदी यांच्या भाषणातून आगामी काळात महिला सक्षमीकरण, विकास आणि कठोर धोरणांवर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Women have taught a lesson to parties opposing reservation, says PM Narendra Modi in sharp attack

महत्वाच्या बातम्या