हिंगोली मध्ये मोठी उलथापालथ: प्रज्ञा सातव अखेर भाजपवासी. चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश
विशेष प्रतिनिधी
हिंगोली: Pradhnya Satav काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव (Pradhnya Satav) भाजपवासी झाल्या आहेत. मंत्री बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
यामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. प्रज्ञा सातव मागील काही महिन्यापासून काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे लवकरच त्या काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार आज त्यांनी सकाळी विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करून अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.Pradhnya Satav
संसदेत ई-सिगारेट ओढल्याचा आरोप; टीएमसी खासदार कीर्ती आझाद वादात, भाजपकडून व्हिडिओ व्हायरल
प्रज्ञा सातव(Pradhnya Satav) यांचे पती राजीव सातव हे राहुल गांधी यांची निकटवर्तीय होते. हिंगोली हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे आणि निवडणुकातील अपयशामुळे पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यातूनच अंतर्गत गटबाजी होऊन काँग्रेस पक्ष जिल्ह्यात कमकुवत झाला.Pradhnya satav
प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्तेही सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाले होते. प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामुळे कळमनुरी तालुक्यात भाजपाला बळ मिळणार आहे.
प्रज्ञा सातव काँग्रेसवर नाराज का?
हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे काँग्रेसचे पकड कमकुवत झाली. दिवंगत खासदार राजीव सातव यांना खासदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्यात राजीव सातव गट आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात संघर्ष सुरू झाला.
राजीव सातव यांच्या निधनानंतर आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. गेल्या निवडणुकीत भाऊ पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सातव समर्थकांकडून करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीमुळे काँग्रेसमधील दुफळी अधिक वाढली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रज्ञा सातव(Pradhnya एatav) यांचे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमिनीची बाजू होती. मात्र याच कारणामुळे पक्षातील इतर नेते प्रज्ञा सातव यांच्यापासून दूर झाले.
राजीव सातव कोण होते?
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाची लाट असताना महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये नांदेड मधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते.
त्यानंतर राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. यानंतर तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य म्हणून काम केले होते. तसेच काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस, गुजरात प्रभारी, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध पदांवर जबाबदारी सांभाळली होती.
Major political upheaval in Hingoli: Pradhnya Satav’s entry into the BJP will take place in Mumbai.
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप