Marathwada ८ जणांचा मृत्यू, ६७ गावांशी तुटला संपर्क; मराठवाड्यात पावसाने घातला धुमाकूळ

विशेष प्रतिनिधी 

बीड : Marathwada राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागात यामुळे पुर परिस्थिति निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सामान्य जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मराठवाडा परिसराला या पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसत आहे.



काय आहे मराठवाड्यातील परिस्थिति?

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३ जणं ही लातूर मधील आहेत, २ जणं बीड मधील आहेत तर धारशिव व नांदेड येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा यात समावेश आहे. केवळ माणसांचाच नाही तर या अतिवृष्टीत मराठवाड्यातील लहान-मोठी मिळून जवळपास १५० जनावरं दगावली आहेत. यात सांभाजीनगरमधील ५, जालन्यामधील १५, परभणी मधील ६, हिंगोली मधील ६, नांदेड जिल्ह्यातील ९, लातूर मधील ७, धारशिव मधील २१, आणि बीडमधील सर्वाधिल ६३ जनावरांचा समावेश आहे. Marathwada

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील तब्बल ६७ गावांशी अद्यापही संपर्क तुटलेलाच आहे. यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार ११ गावं ही छत्रपती सांभाजीनगर मधील आहेत, २ गावं जालना जिल्ह्यातील, तर परभणीतील ३० आणि लातूर मधील २० गावांशी अद्यापही संपर्क तुटलेला आहे.

या पुरपरिस्थितीमुळे मराठवाड्यातील ८ जणांचा मृत्यू झालेला आहे मात्र २१४ जणं अजूनही या पुरात अडकलेली आहेत. यातील धारशिव जिल्ह्यातील सर्वाधिल १५०, जाळण्यातील ३५, तर बीडमधील २९ नागरिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जाळण्यातील ९०, बीडमधील ४४२ आणि धाराशिव जिल्ह्यातील १५० अक्षय एकूण ६८२ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. Marathwada

दरम्यान धारशिव, परभणी आणि बीडमधील परिस्थिति बऱ्यापैकी बिकट झालेली आहे. त्यामुळे तिथे मदतकार्य पोहोचवण्याचा प्रयत्न देखील चालू आहे. यामधील धारशिव जिल्ह्यात आधीच आर्मीच्या माध्यमातून मदतकार्य राबवण्यात येत आहे. तर परभणी आणि बीडमध्येही लवकरच लष्करी जवान पोहोचणार असल्याची माहिती आहे. या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवानही सध्या कार्यरत आहेत.

लातूरमध्ये ११०.०९% पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यामध्ये १ जूनपासून तर आतापर्यंतचा पाऊस हा अपेक्षित पर्जन्यमानाच्या (६६३.८ मिमी) तुलनेत ७०६.०० मिमी म्हणजेच ११८% इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर लातूर जिल्ह्यातील वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) नुसार ७०६.०० मिमी च्या तुलनेत आजतागायत ७८३.० मिमी इतकी म्हणजेच ११०.०९ इतकी नोंद झाली आहे. Marathwada

राज्यात आठवड्याअखेर पुन्हा पाऊस!

राज्यात पावसाने काही दिवसापासून घातलेल्या धुमाकुळानंतर आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Marathwada

8 people died, communication with 67 villages lost; Rain wreaks havoc in Marathwada