विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे मेट्रो लाईन ३ मध्ये ‘नारी शक्ती’चा (Nari Shakti) नवा अध्याय लिहिला जात आहे. ही मेट्रोपूर्णपणे महिलांकडून चालवली जाणार असून, प्रत्येक गाडीचं संचालन महिला पायलट्स करतील. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) ने केओलिस (Keolis) या कंपनीला १० वर्षांसाठी ऑपरेशन्सचा करार दिला आहे.
या उपक्रमाला ‘पुणेरी मेट्रोची नारी शक्ती’ (Nari Shakti) असं नाव देण्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांचे योगदान सशक्त करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा ठरत आहे. पुणे आणि परिसरातील तब्बल १०० महिला पायलट्स यासाठी निवडल्या गेल्या असून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
महिला पायलट्सना तीन महिन्यांचे कडक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात तांत्रिक मॉड्यूल्स, सुरक्षा ड्रिल्स आणि दिवसरात्र मिळून २०० किलोमीटरहून अधिक सुपरवाइज्ड ड्रायव्हिंगचा समावेश होता. प्रशिक्षणात कौशल्य, आत्मविश्वास आणि सुरक्षेला समान महत्त्व देण्यात आलं. प्रशिक्षणादरम्यान माण ते बालेवाडी स्टेडियम या मार्गावर अनेक यशस्वी ट्रायल रनही पार पडल्या.Nari Shakti
पुणे मेट्रो तीनचे सीईओ अनिल कुमार सैनी यांनी सांगितले की या महिला पायलट्स शिस्त, आत्मविश्वास आणि प्रगतीचे प्रतीक आहेत.
पुणे मेट्रोची लांबी :२३ किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडॉर असून : हिंजवडी आयटी हब ते शिवाजीनगर अशी धावणार आहे. पुणे मेट्रो लाईन ३ सुरू झाल्यानंतर दररोज लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आणि शिवाजीनगर यामधील प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
A new chapter of ‘Nari Shakti’ in Pune Metro Line 3, an all-women pilot team will operate the trains
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!