Ambadas Danve : अंबादास दानवेंचा व्हिडिओ बाॅंब, पैशाच्या गड्यांसह आमदार दाखवित सरकारला घेरले

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Ambadas Danve पैशाच्या गड्यांसह एका व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट करून ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असल्याचा आराेप करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)  यांनी खळबळ उडवून दिली आहे.



नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे (Ambadas Danve)  यांनी केलेल्या आराेपांमुळे विराेधकांनी सत्ताधारी महायुतीला घेरले आहे. या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी म्हटले की, ‘या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?’

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राज्य सरकारवर आणि एका आमदारावर धक्कादायक आरोप केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या रोख पैशांच्या बॅगांसह दिसत असल्याचे, आणि तो व्यक्ती आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांनंतर विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण काही आमदारांकडे रोख रक्कमेचे गड्डे आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. या व्हिडीओनंतर आता अधिवेशनात यावरुन विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी मिळाली आहे.

दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे व्हिडीओ सार्वजनिक करा आणि सर्वांना समजेल की काही आमदार पैशांच्या गड्ड्यांसह राजकीय बंदोबस्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे आमदार हे कोण आहेत आणि किती पैशांच्या बॅगांसह फिरत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे, आणि हे प्रकरण कायदेशीर तपासामध्ये जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडीओ सत्य आहे की केवळ राजकीय खेळ हे येणाऱ्या तपासात स्पष्ट होईल. मात्र, यावरुन सरकारवर दबाव वाढू शकतो.

Ambadas Danve’s video bomb, showing MLAs with money bags, surrounds the government

महत्वाच्या बातम्या