Amol Mitkari : अजित पवार यांना मारण्यासाठी विमानात सुसाईड बॉम्बर, आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amol Mitkari  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी व्यक्त केला आहे. 50 कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करण्यास लावले का? याचाही तपास झाला पाहिजे. या प्रकरणी मी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे मिटकरी म्हणाले.



अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे पायलट दोनवेळा बदलण्यात आले होते. ते विमान अगोदरच नादुरुस्त होते. त्याच्यावर एक वर्षापासून बंदी होती. त्यानंतरही अजित पवारांना तेच विमान 28 तारखेला देण्यात आले. व्हीएसआर कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या कंपनीच्या प्रत्येक वैमानिकाचा प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल आणि जो पायलट ऐनवेळी बदलण्यात आला अन् त्याला हिप्नोटाईज केले होते का? त्याला आमिष दाखवण्यात आले होते का? अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो.

मिटकरी म्हणाले, अजमल कसाब यालाही दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळीही असा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाईज करून पाठवले होते का? हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलटने ‘मे डे’चा कॉल दिला नाही. टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, पण पायलटने ते केले नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्हीएसआर कंपनीवर आहे.

Amol Mitkari Alleges Suicide Bomber Angle in Ajit Pawar Plane Crash, Seeks High-Level Probe

महत्वाच्या बातम्या