Ashish Shelar : गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ashish Shelar गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच आहेत. ते लढले आमच्यासोबत आणि गेले दुसऱ्यासोबत, ही गद्दारी नाही का? असा सत्तेत बसण्यासाठी वडलांचे विचार सोडले ही गद्दारी नाही का? असा सवाल वक्तव्य भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.Ashish Shelar

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना शेलार म्हणाले, आजकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आणि उद्धवजींचा ढोंगीपणा उघड होत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. छावा चित्रपटाने पराक्रमाचे दर्शन घडवले आहे. मात्र छावाबद्दल दोन शब्द न काढणारे दोन ढोंगी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. त्यांचा पक्ष हा ढोंगी आहे. संपूर्ण देशाने आनंदोत्सव केला आहे.

मात्र, दोन महाभागाने हा साजरा केला नाही.

कुंभमेळा जगातला सर्वात मोठा श्रद्धा निष्ठेचा मेळा झाला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाकुंभात सहभागी देखील झाले नाहीत. त्यामुळं ते ढोंगी आहेत. वर्तमानपत्रात बातमी वाचली, उबाठा सेनेनं सांगितलं आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी नसणाऱ्यांच्या हातात राज्य आहे. यावर बोलताना शेलार म्हणाले की, तुम्ही वाक्य सुधारा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी गोळ्या घातल्या त्या काँग्रेसबरोबर हातमिळवणी तुमची आहे. हुतात्मा झालेल्या विरांवर हल्ला करत हाताला रक्त लागलं, त्या हाताशी तुमची हातमिळवणी आहे. काँग्रेससोबत हातमळवणी केली हेच आमचं म्हणणं आहे असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar attacked Uddhav Thackeray as the father of betrayal

महत्वाच्या बातम्या