विशेष प्रतिनिधी
जालना : Gunaratna Sadavarte धनगर समाजाला एसटी प्रवर्गातूनआरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी येत असताना रविवारी नागेवाडी जवळ अॅड. गुणरत्न सदावर्तेयांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला.Gunaratna Sadavarte
मंठ्यात मराठा समाजाच्याकार्यकर्त्यांनी “एक मराठा, लाखमराठा’ अशा घोषणा देत सदावर्तेयांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.तसेच गाडीच्या काचांवर बुक्का मारत हल्ल्याचा प्रयत्न केला. जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर नागेवाडी शिवारात ॲड. सदावर्तेयांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Gunaratna Sadavarte
या घटनेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते म्हणाले,.
कोणतीही महत्वाची गोष्ट हाती घेतल्यानंतर अडथळे आणण्याचे प्रयत्न होतात. संविधानाची माहिती नसलेले लोक हल्ले करतात. जशास तसे उत्तरदेण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. मनोज जरांगे यांची भेट आता आंतरवली येथेच होईल.
सदावर्ते म्हणाले, हे काँग्रेसचे दिवस नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवस आहेत. धनगर समाजातील गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके असतील किंवा मंत्री छगन भुजबळ असतील, त्यांनाघेरणार असेल तर हा गुणरत्न घेरा तोडून टाकेल. जरांगे नांदायला सासुरवाडीत आले. जरांगेंनी मराठा बांधवांची फसवणूक केल्याचाही आरोप त्यांनी केला.
Attempted attack on Gunaratna Sadavarte’s vehicle near Jalna
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!