विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीच्या परतवाडा येथे शेकडो तरूणींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयान अहमद याने गोड बाेलून, फसवून अनेक मुलींना जाळ्यात ओढलं, वेगवेगळ्या ठिकाणी, कधी खोलीवर , कधी कॅफेत नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे केले आणि हे सगळे गैरप्रकार रेकॉर्डही केले. वादानंतर जिवलग मित्राने अयानचे त्या मुलींसोबतचे काही व्हिडीओ हळूहळू सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते व्हायरल झाले. मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अनेक मुलींना फसवून त्यांचं शोषण करणाऱ्या आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ काढणाऱ्या आरोपी अयानला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झालेला नाही. त्याने जे कृत्य केलं त्याबद्द त्याला खेद नसल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली आहे. अयान हा एसआयटी चौकशीत अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
कधी फ्लॅटवर, कधी कॅफेत नेऊन तो त्या मुलींशी अश्लील चाळे, अश्लील कृत्य करायचा. मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचा याचीही आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झालं, असा दावाही अयानने स्वतःच्या बचावासाठी केला आहे . मात्र अवघ्या 15 वर्षांची एक अल्पवयीन पिडीत समोर आल्याने त्याचा भांडाफाेड झाला आहे.
या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर, दोन मुलींवर लैंगिक अत्याचारही उघड झाला होता. पीडित मुलींनी समोर येण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले होते. मात्र, भीती व बदनामीपोटी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने नागपूर येथून या १५ वर्षीय मुलीचा शोध लावला.
अयान अहमद याने अनेक मुलींशी शारीरिक जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले होते. पैशांच्या वादातून त्याचा मित्र उजेर खान याने हे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण आठ पीडित मुलींची ओळख पटली होती, त्यापैकी दोन मुलींवर शारीरिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते.आता या १५ वर्षीय मुलीच्या जबाबामुळे या प्रकरणात पोक्सो कलमांतर्गत अधिक कारवाई होण्याची शक्यता आहे.
फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या पाच मोबाईलपैकी तीन मोबाईलचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून, आता या डेटाच्या सखोल विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
Ayan, who was accused of sexually abusing hundreds of girls, recorded the abuse and posted it on social media.
महत्वाच्या बातम्या