विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bhaskar Jadhav हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच पेटला. सरकारकडून अद्यापही विरोधी पक्षनेते पदावरील निर्णय न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, “सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, कारण सरकारमधील सहकारीच विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना कल्पना आहे.Bhaskar Jadhav
महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव अधिकृतपणे प्रस्तावित केले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मात्र, सरकारने आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली तर “मी एका क्षणात पदाचा त्याग करेन,” असे जाधव यांनी जाहीर केले.Bhaskar Jadhav
जाधव म्हणाले की, दहा टक्के आमदार असलेल्या पक्षालाच विरोधी पक्षनेते पद दिले जाते हा समज चुकीचा आहे. “मी सचिवालयाला लिखित विचारणा केली आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारची कोणतीही अट कायद्यात नाही,” असा दावा त्यांनी केला.
जाधव सरकारवर आरोप करताना म्हणाले,
“या सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे तर फक्त हिमनगाचे एक टोक आहेत. एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा सुरू आहे. विरोधी पक्षनेता झाला तर सरकारमधील लोकच त्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे,” असे ते म्हणाले.
जाधव म्हणाले की, “हे सरकार अनपेक्षितपणे तयार झाले. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांना १६ खासदारही पार करता आले नाहीत. सत्ता स्थापनेपासूनच त्यांच्यातील कुरबुरी सुरू आहेत. शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले गेले अशी माझी माहिती आहे, पण तसे झाले नाही. आता मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची ताकद त्यांच्यात नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
स्थानिक पातळीवर बदल होत असतात, पण ठाकरे यांची शिवसेना संपणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निकाल आमच्या बाजूने येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
The government is afraid of the opposition leader, alleges Bhaskar Jadhav
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध