भाजपा – राष्ट्रवादी – शिवसेनेत रस्सीखेच; परभणी – हिंगोलीची जागा कुणाच्या वाट्याला?

विशेष प्रतिनिधी

परभणी: परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे या जागेवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला आहे.भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे.

मराठवाड्यात गेल्या काही वर्षात भाजपाने मोठ्या प्रमाणात संघटनात्मक विस्तार केला आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याचा आधार घेत भाजपाने हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याचा आग्रह धरला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्या जागेवर भाजपचा नैसर्गिक दावा असल्याचे सांगण्यात आले आहे. जवळपास १५० सदस्यांचे संख्याबळ आपल्याकडे असल्याचे सांगत,ही जागा आपल्याच वाट्याला यावी यावी, यासाठी पक्षात आता जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.



राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील परभणी – हिंगोली मतदारसंघावर दावा केला आहे.या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले नेटवर्क असून स्थानिक स्वराज्यसंस्थेत प्रभावी संख्याबळ असल्याचे सांगीतले जात आहे.पक्षाचे आमदार राजू नवघरे यांनी भूमिका मांडत ” या भागात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत, त्यामुळे हा या मतदारसंघात आमदार आमचाच असावा “, असा स्पष्ट दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी देखील जागा पक्षासाठी प्रतिष्ठेची असल्याचे सांगत उमेदवारीवर ठाम भूमिका घेतली आहे.

गतवेळी परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेच्या ताब्यात होती. विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.मात्र, माहितीतील इतर पक्षांनी त्यांच्या उमेदवार बाबत अक्षय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

परभणी – हिंगोली विधान परिषद मतदार संघ हा मराठवाड्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत माहिती राजकीय रस्सीखेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP – rashtrvadi – Shiv Sena tug of war; Who will get the Parbhani – Hingoli seat?

महत्वाच्या बातम्या