विशेष प्रतिनिधी
मुंबई: नगरपालिका निवडणुकांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी दिल्याचा आरोप झेलणाऱ्या भाजपने आता महापालिका निवडणुकांसाठी आपली रणनीती पूर्णतः बदलली आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत स्पष्टपणे दिसून आली. Devedra Fadnavis
मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर, आज अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपच्या अनेक आमदार आणि खासदारांच्या मुलांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. Devedra Fadnavis
नाशिकमध्ये भाजपच्या दोन आक्रमक महिला आमदारांच्या कुटुंबीयांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने पक्षाच्या धोरणानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. “या निर्णयामुळे सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळेल,” अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली. तसेच, आमदार सीमा हिरे यांच्या मुलीनेही नाशिक महापालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे.
कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सुरुवातीला वरिष्ठांच्या परवानगीने अर्ज भरला असला, तरी राज्य पातळीवर “घरातील व्यक्तींना उमेदवारी नाही” हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी तात्काळ माघार घेण्याचा निर्णय घेतला. “आम्ही पक्षाचे आदेश पाळणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत,” असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपच्या या कठोर धोरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंब अपवाद ठरले आहे. नार्वेकर यांच्या भावाला आणि वहिनीला उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
तिकीट न मिळाल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, त्यांची समजूत काढणे हे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. यासंदर्भात खासदार महाडिक म्हणाले की, “महायुतीची जुळवाजुळव करताना काही ठिकाणी अन्याय झाल्याची भावना असू शकते. मात्र, येत्या दोन दिवसांत सर्व नाराजांची समजूत काढली जाईल. अनेक काँग्रेसचे इच्छुक आमच्या संपर्कात आहेत, पण आता भाजपची यादी अंतिम झाली आहे.”
BJP Puts Brake on Dynastic Politics in Civic Polls Devedra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत