भाजप – शिंदे गटात दिलजमाई, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका व्यासपीठावर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुमसत असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि स्थानिक निवडणुकांवरून निर्माण झालेली कटुता विसरून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शनिवारी डोंबिवलीत एकाच मंचावर आले होते. Eknath Shinde and Ravindra Chavan

रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल्याच्या चर्चा होत्या. यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले होते. हे प्रकरण थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात पोहोचले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन, हे प्रकरण त्यांच्या कानावर घातल्याच्या चर्चा होत्या.



चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख ‘कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार’ असा केला. रविंद्र चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सतत महायुतीचा उल्लेख केला. “महायुती म्हणून आम्ही विकासाची कामे केली आहेत आणि पुढेही करत राहू. एकविचाराचे सरकार असले की विकास वेगाने होतो,” असे सांगत त्यांनी वादाच्या चर्चांना बगल दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पार पडत आहेत. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर या कल्याण डोंबिवलीत निधी मिळू लागला आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर सर्वात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आल्याचे देखील श्रीकांत शिंदे म्हणाले.

BJP–Shinde Camp Show of Unity as Eknath Shinde and Ravindra Chavan Share Stage

महत्वाच्या बातम्या