विशेष प्रतिनिधी
बीड : शिक्षण क्षेत्राला काळिमा फासत अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. शनिवारी मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरात केली. student in Beed
बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होटी. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. तिला नग्न करत आपल्या मोबाईल मध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
प्रशांत खाटोकर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी 26 जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली.
विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. student in Beed
Both teachers arrested for sexually harassing a student in Beed
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल
- Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा
- filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
- Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात