Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून हल्ला करण्याची धमकी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून हल्ला करण्याची धमकी

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Devendra Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअँपवरून हल्ला करण्याची धमकी देण्यात आले आहे. स्वतःला मलिक शहबाज हुमायून राजा म्हणविणाऱ्याने हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअँपवरून हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हॉट्सऍप मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. मुंबईतील वरळी पोलिसांनी हा मेसेज मिळाल्यावर लगेचच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला होता. हा मेल गोरेगाव, जे.जे. पोलीस स्टेशन, सीएमओ आणि मंत्रालय येथे पाठवण्यात आला होता. या प्रकरणातील संशयिताला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्यानेच कथितरित्या मेल पाठवल्याचे तपासात समोर आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील धमकी आल्याने सर्व यंत्रणा ऍलर्ट मोडवर गेल्या आहेत.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांना हा धमकीचा मेसेज व्हॉट्सऍपद्वारे मिळाला आणि तोही पाकिस्तानी नंबरवरून. बुधवारी दुपारी हा मेसेज मिळाल्यानंतर पोलीस एकदम सतर्क झाले आहेत. हा मेसेज पाठवणाऱ्याचे नाव मलिक शाहबाज हुमायूं राजा देव असे सांगितले जात आहे. हा मेसेज पाठवणारा व्यक्ती भारतात आहे की भारताच्या बाहेर आहे, याचा शोध घेतला जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानी नंबरवरून आलेल्या या मेसेजची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या एकत्रित चौकशीस सुरुवात केली आहे.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मेल गोरेगाव आणि जे.जे. मार्ग पोलीस स्टेशनसह अनेक सरकारी कार्यालयांना पाठवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या मेल प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4), आयटी ऍक्ट आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

26/11 चा दहशतवादी हल्ला कोणताही मुंबईकर कधीच विसरू शकत नाही. अशाच प्रकारचा हल्ला 20 ऑगस्ट 2022 रोजी करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला होता. तेव्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती.

Chief Minister Devendra Fadnavis threatened to attack from Pakistani number

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

Warkaris

Warkaris : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023