विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामुळे अनेकांना मळमळ हाेतेय. आम्हाला का बाेलावले नाही, म्हणून असुया वाटतेय. त्यातूनच टीका केली जात असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक आंदोलनांना ‘आजार’ संबोधले. यावरून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोहन भागवत यांच्यावर टीका केली.
यावर पलटवार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, माझे तर अगदी स्पष्ट मत आहे की, निमंत्रण मिळाले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटत आहे. म्हणून ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १०० वर्षे पूर्ण झाल्याबाबत संघाच्या संदर्भात लोकांना वाद, अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातील प्रश्न दूर व्हावेत. याकरिता समाजाच्या विविध क्षेत्रातील, विविध जाती-समाजाचे, विविध उद्योग क्षेत्रातील असे सगळे लोक निमंत्रित केले होते. आपण पाहिले असेल, तर बहुतांश लोक असे होते की, ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही. विशेषतः दोन दिवस माननीय, पूजनीय सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केले नाही, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. या उत्तरांमुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, यामुळे अनेकांना तळमळ वाटते, कोणाला मळमळ होतेय, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अनेक लोक यावर बोलत आहेत. त्या सगळ्यांची असूया एवढीच असावी की, आम्हाला का बोलावले नाही.
दोन दिवसीय कार्यक्रमात एकतर्फी चर्चा झाली नाही, दोन्ही बाजूंनी संवाद झाला. या कार्यक्रमात संघाच्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. संघाबाबत असलेल्या काही समजुती, गैरसमज यांचे निराकरण करण्यात आले. सर्वांचे प्रश्न आणि शंका सरसंघचालकांनी ऐकून घेतले आणि उत्तरे दिली. असे कोणतेही संघटन नसेल, जे त्या संघटनेच्या विचारांशी सहमत नसलेल्या, संबंध नसलेल्या लोकांना निमंत्रणे देत असेल आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंका-समाधान करत असेल. संपूर्ण जगात सर्वांत मोठ्या असलेल्या संघाचे प्रमुख अशी गोष्ट करत असतील, तर ती खूप मोठी गोष्ट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Chief Minister Devendra Fadnavis’s counterattack on Raj Thackeray over criticism of Sarsanghchalak over why he didn’t give us a chance
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,