विशेष प्रतिनिधी
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून मंत्री राज्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करतील. Devendra Fadnavis
राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री नितेश राणे यांनी भाग घेतला.
बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेची माहिती सादर केली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “जसे पंचनामे पूर्ण होतील तसे शेतकऱ्यांना मदत तत्काळ दिली जाईल. यासाठी महसूल विभाग आणि मदत व पुनर्वसन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यभरात पिकांचे, जमिनीचे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत २,२१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत मदत व पुनर्वसन विभागामार्फत वितरित केली जाणार आहे.
CM Devendra Fadnavis orders ministers to go directly to farmers farms to inspect heavy rainfall
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!