विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chief Minister महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या आणि काही विधेयके पटलावर ठेवताच विरोधकांनी सरकारवर कमी दिवसांच्या अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भास्कर जाधव यांनी अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याचे सांगत सरकारला ठणकावत प्रश्न विचारले.मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणाले, “पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या दाखवतो हा नियम आहे. विधेयकांबाबतची माहितीही पहिल्या दिवशीच दिली जाते. अध्यादेशही पहिल्या दिवशीच पटलावर ठेवणे बंधनकारक असते. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत पहिल्या दिवशी यापेक्षा वेगळा अजेंडा कधीच दिसला नाही.”
विरोधकांस टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले,
मी मुख्यमंत्री असताना नागपुरात सर्वात जास्त काळ अधिवेशन चालले. आम्हालाही अधिवेशन जास्त दिवस चालावे अशीच इच्छा आहे. पण आचारसंहितेमुळे अधिवेशन कमी ठेवावे लागले.”
त्यांनी विरोधकांना आठवण करून दिले की,
“मविआच्या काळात कोरोना असताना नाना पटोलेच अध्यक्ष होते, तेव्हा तीन आणि पाच दिवसांचे अधिवेशन झाले होते. त्यामुळे आता टीका करणे योग्य नाही.”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की,
“कामकाजाचे दिवस ठरवताना बीएसईमध्ये चर्चा होते आणि तेथे सर्वसंमतीने निर्णय घेतला जातो. यावेळी नाना पटोले बीएसईमध्ये नव्हते, त्यांची काही कारणे असतील.”
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले, “बीएसईमध्ये निर्णय सर्वसंमतीने व्हावा ही अपेक्षा असते. पण आम्ही कमी दिवसांच्या अधिवेशनाला मान्यता दिली नाही. आम्ही ८ ते १९ दिवस अधिवेशन वाढवण्याचा आग्रह केला होता.”
यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी हा मुद्दा विचारात घेण्याचे आश्वासन दिले.
Confusion over fewer days of work in the winter session. Opposition surrounds the government, Chief Minister’s blunt response
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध