Deepak Salunkhe : शहाजीबापुंकडे दीपक साळुंखे यांनी केली ही मागणी!

Deepak Salunkhe : शहाजीबापुंकडे दीपक साळुंखे यांनी केली ही मागणी!

विशेष प्रतिनिधी

सांगोला  : सांगोला विधानसभेत विद्यमान आमदार शहाजी पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाने मोठे मन करून मला पाठिंबा द्यावा अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे . त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा दिला आहे.

दिपक साळुंखे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाचे त्यांनी राजीनामे दिल्याने अजित पवार गट आणि महायुतीला धक्का बसला आहे. साळुंखे यांनी राजीनामा दिल्याने सांगोल्यात आमदार शहाजी पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला ती जागा देण्याचा निर्णय झाल्यामुळे, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल विधानसभेची जागा विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासाठीच शिवसेना शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी बंडखोरीचे आव्हान दिले आहे. . गेल्या निवडणुकीत अतिशय निसटता विजय मिळवलेले शहाजी बापूंना पारंपारिक विरोधक शेतकरी कामगार पक्ष याच्याशी दोन हात करताना त्यांना एक एक मताची आवश्यकता भासत आहे.

सध्या शेतकरी कामगार पक्षामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख हे दोन भाऊ उमेदवारीसाठी झगडत असून याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत. दीपक साळुंखे ठाकरे गटाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे येथील उमेदवार असणार आहेत आणि असे झाल्यास या तिरंगी लढतीत कशा रीतीने सामोरे जायचे याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत.

Deepak Salunkhe made this demand to Shahjibapu!

महत्वाच्या बातम्या 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023