विशेष प्रतिनिधी
दापोली : Bhaskar Jadhav कोकणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोलीच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे बंधू बाळाशेठ जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पाठवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.Bhaskar Jadhav
भास्कर जाधव हे ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणाऱ असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे गटात आपल्याला महत्त्व दिले जात नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या बंधूंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार रामदास कदम म्हणाले की, आम्ही शिवसेनेत उठाव केला त्याला अनेक कारणे आहेत. आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे यांनी केला, पण मी उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातून त्यांना नाही उध्वस्त केल तर नाव रामदास कदम नाव लावणार नाही.
कदम म्हणाले की, या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपवून टाकायचा इतका घाणेरडा विचार करेल, खालच्या पातळीचा विचार हा फक्त उद्धव ठाकरे यांनाच करता येऊ शकतो. तीन वर्षांपूर्वी याच उद्धव ठाकरे यांनी इथे दापोली, मंडणगडमध्ये काही सुभेदार पाठवले होते, व्यासपीठावरून सगळ्यांची हकालपट्टी केली, व्यासपीठावरूनच त्या सुभेदारांनी काही नियुक्ती केल्या.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी नव्हती.
योगेश कदम म्हणाले, तीन वर्षापूर्वी अनिल परब यांनी येथे येऊन घाणेरडे राजकारण केले होते. शिवसेनेची एक हाती सत्ता येत असताना त्यांनी परस्पर हात मिळवणी केली. मात्र आज या सगळ्याला शिवसेनेत प्रवेश करून या १४ नगरसेवकांनी उत्तर दिलं आहे. आता पुढच्या दोन वर्षात दापोलीचा विकास केला जाईल. दोन वर्षानंतर होणार्या निवडणुकीचा निकाल आजच लागला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Did Bhaskar Jadhav’s brother go to Shiv Sena or sent? A shock to the Thackeray group in Konkan
महत्वाच्या बातम्या
- स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप