तुमचं राजकारण नंतर करा : साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याेती वाघमारे यांना सुनावले

विशेष प्रतिनिधी

साेलापूर : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयएएस अधिकाऱ्याशी स्पिकर फाेनवरून बाेलताना दमबाजीची भाषा केल्याचा मुद्दा गाजला हाेता. मात्र, साेलापूर जिल्ह्यात वेगळाच किस्सा घडला. जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सर्वांसमाेर स्पिकरवर ठेऊन फाेन केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्याेती वाघमारे यांना चांगलेच खजिल व्हावे लागले. वाघमारे यांनी काही बाेलण्यापेक्षा तुमचं राजकारण नंतर करा असे म्हणत साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झापले. Jyoti Waghmare



राज्यातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले आहेत. राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांकडूनही मदत केली जात आहे. पूरग्रस्तांसाठी आपण किती धडपड करत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्नही काही नेत्यांकडून होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माेठा फटका बसला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात जाऊन शिवसेना शिंदे गटाकडून अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. त्याच दरम्यान, ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अपुऱ्या मदतीच्या मुद्यावर फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट त्यांनाच झापलं 3000 लोकसंख्या असलेल्या गावात ज्योती वाघमारे यांनी शिवसेना पक्षाकडून फक्त 200 किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन वरून बोलताना उलट ज्योती वाघमारेना खडे बोल सुनावले, आता ही राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावले. पूरग्रस्तांना आम्ही बाहेर काढलं, तुम्ही काढलं नसल्याचंही आशीर्वाद म्हणाले.

Do your politics later: Solapur District Magistrate tells Jyoti Waghmare

महत्वाच्या बातम्या