विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचेही बारामती येथील विमान अपघातात निधन झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार पहिला दौरा सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटणला असणार आहे. यावेळी त्या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत. Sunetra Pawa
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी कराडच्या प्रीतीसंगम येथे जाऊन त्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील.
अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कराडचे प्रीतीसंगम आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा नेहमीच प्रेरणास्थान राहिली. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या काळात अजितदादांनी नेहमीच या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली होती. आपल्या भाषणांमधूनही ते ‘चव्हाणसाहेबांची विचारसरणी’ हाच आपला आधार असल्याचे सांगायचे. आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीतीसंगमावरून करून, आपण दादांचा हा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्यास सज्ज आहोत, असाच संदेश दिला आहे.
सकाळी १०:०० वाजता त्या कराड येथील प्रीतीसंगम बागेत आगमन आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करणार आहेत. दुपारी १:०० वाजता लोणंद-तरडगाव (ता. फलटण) येथे विदीप जाधव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार आहेत.
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. अजित पवारांची सावलीसारखी साथ देणाऱ्या विदीप यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात सहभागी होण्यासाठी सुनेत्रा पवार त्यांच्या घरी जाणार आहेत. कालच आमदार रोहित पवार यांनी विदीप यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.
Dy CM Sunetra Pawar to Retain Ajit Pawar’s Bodyguards, Meets Vidhyap Jadhav’s Family
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते:सुषमा अंधारेंचा सुनेत्रा पवारांना पत्र लिहून सावध राहण्याचा सल्ला
- Sunetra Pawar राज्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपात मिळाल्या पहिल्या उपमुख्यमंत्री
- निवडणूक पथकाकडून मावळमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
- कार्यकर्ते सैरावैरा होऊ नयेत म्हणून निर्णय, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका