विशेष प्रतिनिधी
ठाणे: Eknath Shinde काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.Eknath Shinde
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एकनाथ पर्व – आपला लाडका भाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान रचत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मी चार भिंतीत रमणारा नाही. तर कामामध्ये आणि लोकांच्या सेवेत रमणारा आहे असे शिंदे म्हणाले. माझ्या अडीच वर्षांच्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली. मी कर्तव्य म्हणून काम केले. ‘एकनाथ पर्व’ हे विकासाचे, महाराष्ट्रातल्या समृद्धीचे पर्व होते असेही ते म्हणाले. राज्याचे महत्त्वाचे पद भूषवित असतानाही मी पायाला भिंगरी लावून फिरलो. अडीच वर्षात प्रचंड कामे केली. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना राबविल्या. सर्वसामान्यांच्या कुटुंबाची ओढाताण काय होते मी पाहिले आहे. त्यामुळे मी लाडकी बहिण योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या गावी मी शेती केली. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. परंतु गावी गेल्यावर बातम्या सुरु होतात, एकनाथ शिंदे नाराज आहेत . ठाणे हे माझे जीवाचे प्राण आहे. माझ्यात कधीही बदल होणार नाही. कारण दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत मी घडलो आहे. आज ठाण्याचा विकास होत आहे. काही प्रकल्प, योजना ठाण्यात सुरु झाले. त्यानंतर हे प्रकल्प राज्यात सुरू झाले.
अडीच वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. शिवसेना वाचविण्यासाठी मी धाडस केले. आता राज्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे. आम्ही शासन आपल्या दारी योजना राबविली. जिथे संकट असते. तिथे मी पोहचतो. विरोधकांनी सर्व प्रकल्पांना विरोध केला होता. परंतु मी या विरोधकांचा विरोध मोडून काढला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांना सवंगडी समत होते. परंतु आताचे लोक कार्यकर्त्यांना घरगडी समजत होते असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
Eknath Shinde said.. nobody can touch my hair!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis ड्रग्सशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फ, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना इशारा
- Madhuri Misal एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
- Devendra Fadnavis ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सापडला तरी थेट निलंबन, मुख्यमंत्र्यांचा इशारा
- Walmik Karad संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मास्टरमाईंड, सीआयडीचा आरोपपत्रात दावा