विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर यांसह 29 महापालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.
* उमेदवारी अर्ज दाखल: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
* अर्ज मागे घेणे: 2 जानेवारी
* अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 3 जानेवारी
* मतदान: 15 जानेवारी
* मतमोजणी आणि निकाल: 16 जानेवारी
राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, या निवडणुका पारदर्शक, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सर्व आवश्यक निर्देश दिले आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरनिहाय मतदार यादीचे पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले असून इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनांची तपासणीही अंतिम टप्प्यात आहे.
पक्षांतर्गत गटबाजी, नाराजी, तिकीट वाटपातील संघर्ष आधीच उफाळू लागले आहेत. अनेक ठिकाणी तिकिटासाठी इच्छुकांनी थेट पक्ष नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यातील राजकीय समीकरणांवर संपूर्ण राज्याची नजर आहे.
निवडणुकांची तारीख जाहीर होताच राज्याच्या राजकीय पटावर खऱ्या अर्थाने रणशिंग फुंकले गेले आहे. आता 29 महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार, यासाठी सर्वांचेच डोळे 16 जानेवारीकडे लागले आहेत.
Elections have been announced for 29 municipal corporations in Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध
