विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाड्यात केवळ पिकांचे नाही तर अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. अ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करा असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलेआहे.
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापून वाटल्याबद्दल पत्रकार परिषदेत बाेलताना संताप व्यक्त करताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मिंध्यांसारखे लोक परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत. लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचार करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे. जर त्यांच्याकडे एवढा पैसा असेल, तर सरकारी मदतीवर फोटो लावण्याऐवजी नगरविकास खात्याने लुटलेले पैसे शेतकऱ्यांना द्यावे.
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची घरे, शेती व जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये पिकं नष्ट झाली असून, माती वाहून गेल्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील, असे सांगून राऊत म्हणाले, मराठवाड्यातील या अतिवृष्टीमुळे अनेक पिढ्यांचे शेती व जमीन नुकसानाला सामोरे गेली आहे. “शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, माती वाहून गेल्यामुळे शेतकरी समाजावर परिणाम झाला आहे. मराठवाडा उध्वस्त झाला आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे मराठवाड्यासाठी 10 हजार कोटींची मदत मागणी केली आहे. या निधीचा उपयोग पिकांचे नुकसान भरून काढणे, शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे आणि जमिनी व घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक नेत्यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, असे राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
सरकारकडे कोणतेही कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. याआधी देखील जो दुष्काळ झाला, त्या संदर्भात जी आश्वासने सरकारने दिली होती, ती पूर्ण झालेली नाही. याचे कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही. या सरकारवर नऊ ते दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कुटुंबांना मदत कशी करणार? असा प्रश्न करत संजय राऊत म्हणाले, ओला दुष्काळ शब्द सोडूनच द्या. हा आघात साधा नाही. केवळ पिके वाहून गेलेली नाही. तर माती आणि जमिनी वाहून गेल्या आहेत. ज्या मातीमध्ये पीक काढले जाते ती मातीच उरलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे.
Empty Mindhya’s Coffers to Help Flood Victims, Thunders Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!