Suresh Dhas : धनंजय मुंडे विरोधाची आमदार सुरेश धस यांना मिळाली ही शिक्षा !

Suresh Dhas : धनंजय मुंडे विरोधाची आमदार सुरेश धस यांना मिळाली ही शिक्षा !

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धंनजय मुंडे यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. त्याची राजकीय शिक्षा त्यांना मिळाली आहे. आमदार धस याना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या यादीतून वगळले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. जिल्ह्यातील दोन आमदारांना जोरदार धक्का अजित पवारांनी बैठकीपूर्वी दिला आहे. अजित पवारांनी स्वपक्षीय ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके आणि भाजपचे सध्या चर्चित आमदार सुरेश धस या दोघांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या यादीतून वगळले आहे. त्यांच्या ऐवजी दोन तरुण आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार धस आणि सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले आहे, त्याचाच फटका त्यांना बसला असल्याची चर्चा आहे.



राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील आरोपी सध्या कोठडीत आहेत. तसेच या घटनेतील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या बरोबरच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. आमदार सुरेश धस त्याचे नेतृत्व करत आहेत.

For Dhananjay Munde opposition MLA Suresh Dhas got this punishment!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023