Tanaji Sawant : कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, ‘या’ चार गावात मागं पडायचं नाही, तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Tanaji Sawant कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे या’ चार गावात मागं पडायचं नाही, अशी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.Tanaji Sawant

माजी मंत्री तानाजी सावंत याचे ऐन मतदानादिवशी पैसे वाटपाबाबत कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्टपणे ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पैशाबाबतची चर्चा थेट व्हॉट्सॲपवर करण्याचे निर्देश कार्यकर्त्याला देण्यात आले असल्याचे ऐकू येते. “पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,” असे म्हटले गेले आहे.Tanaji Sawant



फक्त गोडगोड बोलून उपयोग नाही, प्रत्यक्ष काम दाखवण्यावर भर द्या. मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून काम सुरू करा. दोन घेऊ, तीन घेऊ, कोणी चार घेऊ, अशा शब्दांत मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या संभाषणातून पुढे येतो. शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही कॉम्प्रमाईज करायचा नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचे या क्लिपमध्ये नमूद आहे. “50 लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत,” असे म्हणत खर्चाच्या मर्यादेची कोणतीही अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येते. संवेदनशील मतदारसंघ असल्याचे सांगत कोणाचाही विचार न करता याद्या तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. कोणाशीही चर्चा न करता, एक शब्दही बाहेर न जाता सर्व माहिती फक्त व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे आदेश दिल्याचेही या संभाषणात ऐकू येते.

सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर या क्लिपची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

“Forget One or Two Crores, Don’t Fall Behind in These Four Villages”: Tanaji Sawant Audio Clip Goes Viral on Social Media

महत्वाच्या बातम्या