विशेष प्रतिनिधी
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. लातूर, मराठवाडा आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात त्यांनी दिलेल्या योगदानाची व्याप्ती मोठी होती. Shivraj Patil Chakurkar
शिवराज पाटील चाकूरकर हे काही दिवसांपूर्वी दिल्लीवरून लातूरमध्ये एका कौटुंबिक लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. येथे आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावू लागली. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर देवघर निवासस्थानी कुटुंबीय डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, तसेच एक वैद्यकीय पथकही सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
5 डिसेंबरपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. अन्न आणि पाणी घेणे त्यांनी पूर्णपणे बंद केले होते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवराज पाटील चाकूरकर यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास अत्यंत उल्लेखनीय मानला जातो. लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, नंतर ते राज्य आणि केंद्र अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाची पदे भूषवली. विविध मंत्रालयांमध्ये त्यांनी काम केले, तसेच भारताचे गृहमंत्री म्हणून महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांनी नेतृत्व केले.
हळुवार वागणूक, सुसंस्कृत सार्वजनिक जीवन, आणि संयमी राजकारण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात होते. आज त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्राने एक अनुभवी, मार्गदर्शक आणि सुसंस्कृत नेता गमावला आहे.
Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar passes away
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध