हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्ष भाजपाला विकला, भिवंडी शहराध्यक्षांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना समाजवादी पक्षाच्या आमदाराला हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला, असा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी केले आहेत. त्यामुळे सपकाळ यांनी भिवंडीत जमविलेल्या समीकरणावर स्थानिक काॅंग्रेस नेत्यांची नाराजी समाेर आली आहे. Harshvardhan Sapkal

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत आला तरी भिवंडी महानगरपालिकेमधील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाला आहे. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडामोडींना भिवंडीतील स्थानिक नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नव्हतं. काँग्रेस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने भिवंडीमध्ये इतर समविचारी पक्षांना घेऊन आघाडी करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामधून सेक्युलर फ्रंट असा गट स्थापन झाला. भाजपातील ९ नगरसेवकांच्या एका गटानेही काँग्रेससोबत सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला, तसेच काँग्रेसने या गटातील नेते नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली.

मात्र काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेतृत्वाकडून घेण्यात आलेला हा निर्णय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या पचनी पडलेला नाही. पक्षाचे शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भिवंडीमधील परिस्थितीची थेटपणे हाताळणी केली जात आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून आदेश देत आहेत, व्हीप काढत आहेत. जिल्हाध्यक्षांना कल्पना न देता न कळवता हे काम सुरू आहे. त्यामुळे भिवंडीमधील आमची पूर्ण कार्यकारिणी आणि कार्यकर्ते नाराज आहेत.

Harshvardhan Sapkal sold the Congress party to BJP, alleges Bhiwandi city president

महत्वाच्या बातम्या