Heavy rains : या आठवड्यातही महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी? वाचा हवामान खात्याचा अंदाज!

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Heavy rains गेल्या आठवड्यातच पावसाने महाराष्ट्रात चांगलाच जोर दाखवला होता. मात्र आता हवामान खतयाने पुन्हा एकदा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा परिसरात विजांचा कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले होते. अशातच काही तासांपूर्वी हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजाने साऱ्यांची चिंता वाढवली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात ४०-५o किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि गोव्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Heavy rains



छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जळगाव आणि नाशिकला आज (ता.२२) रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. या जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याला उद्या (ता.२३) आणि परवा (ता.२४) सप्टेंबर रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव आणि नाशिक भागात केवळ उद्या (ता.२३) यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात या ठिकाणी वादळी वारा व विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Heavy rains

पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना २२, २३ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला २२, २३, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला २२ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलाय. या काळात या ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला २३ आणि २६ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आलाय. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना २२ आणि २३ सप्टेंबर रोजी, तर जळगाव-नाशिकला २३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला २३ आणि २४ सप्टेंबर, पुणे जिल्ह्याला २२, २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्याचा घाट भागात २२ ते २६ सप्टेंबरपर्यत यलो अलर्ट देण्यात आला आहे. Heavy rains

कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला २२ आणि २३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर घाट कोल्हापूर, घाट साताऱ्याला २३, २३ आणि २५, २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्याला २२, २३, २४, २५ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला २३, २४ सप्टेंबर आणि जालना जिल्ह्याला २२, २३, २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्याला २२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी तर बीड जिल्ह्याला २३, २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला २२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्याला २३, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला २२ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. Heavy rains

अकोला, अमरावती, भंडारा जिल्ह्याला २२, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा जिल्ह्याला २२, २३ आणि २५,२६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना देखील २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्याला २२, २४, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला २२, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांना २२, २३ आणि २५, २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. Heavy rains

एकूणच येणाऱ्या संपूर्ण आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस महाराष्ट्राला चांगलच झोडपणार असल्याचं दिसत आहे. आधीच पावसामुळे आतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या आठवड्यातही काही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. तरी सर्व परिसरातील लोकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. Heavy rains

Heavy rains in Maharashtra this week too? Read the Meteorological Department’s forecast!

महत्वाच्या बातम्या