विशेष प्रतिनिधी
सांगली : मला मंगळसूत्र चोर म्हणतात, तर जयंत पाटील यांनी सांगावे की मी त्यांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरले आहे,” असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Gopichand Padalkar
काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विधानावरून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली होती. वादग्रस्त विधाने करणे टाळावी, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकर यांना ताकीद दिली होती. या घटनेला काहीच दिवस झाले असताना आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर जयंत्या म्हणत टीका केली.
गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केलेल्या विरोधकांना शायरीतून उत्तर दिले आहे. ‘बडी सी बडी हस्तीं मीट गई मुझे मीटाने मे! ‘तेरी उम्र जायेगी मुझे मिटाने मे’, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे. तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधाराची रात्र असेल अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान केले.
मला गोप्या म्हटले गेले, मग मी तुला जयंत्या म्हटले तर चालेल का? जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आवाहन करतो, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या. गोपीचंद पडळकरने इश्वरपूरमध्ये यायचे की वाळव्यात यायचे. दिनांक, वार आणि वेळ सांगा मी तिथे येतो. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही. तुम्ही सांगाल तिथे मी येतो.” असे म्हणत पडळकर यांनी थेट आव्हानच केले आहे.
“माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. विरोधक म्हणतात की माझे संस्कार खराब आहेत, पण ते काहीही म्हणू देत, मला काही फरक पडत नाही,” असे म्हणत त्यांनी टीका केली.
“How Many Wives’ Mangalsutras Did He Steal? Jayantya Taunts Gopichand Padalkar”
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!