Sanjay Raut पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका! संजय राऊतांचा सरकारवर संताप

विशेष प्रतिनिधी

लातूर : Sanjay Raut पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सुनावले

संजय राऊत यांनी मराठवाड्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचामराठवाडा दौरा हा केवळ भास आहे. खरंच शेतकऱ्यांशी संवाद साधतात का, कधी त्यांचा आक्रोश ऐकतात का? Sanjay Raut



मराठवाड्यात तब्बल 36 लाख शेतकरी उध्वस्त झाल्याचे सांगत राऊत म्हणाले, “अनेक जिल्ह्यांत काहीच उरलं नाही. शासन संवेदनाहीन आणि मुर्दाड बनलं आहे.”शासन शेतकऱ्यांसाठी पैसे देत नाही, पण निवडणुकांवर कोट्यवधी रुपये उधळते,” लाडक्या बिल्डरच्या एसआरए प्रकरणात खिसे तपासले तरी पैसे मिळतील, Sanjay Raut

राऊत यांनी आठवण करून दिली की, “कोरोना काळात आमदार-खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदतीसाठी देण्याचे आवाहन आम्ही केले. आमच्या पक्षाने दिले, पण भाजपने देण्याऐवजी PM केअर फंडमध्ये पैसे जमा केले.

राष्ट्रीय सुरक्षेवरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लेह-लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीन घुसला आहे, आणि तुम्ही सीमाही सुरक्षित ठेवू शकत नाही. मग कसले विश्वगुरु,? Sanjay Raut

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लातूर ते संभाजीनगर दौऱ्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. विरोधी पक्ष नेते या दौर्‍यात नसल्याचे सांगून राऊत म्हणाले, “ते असते तर विधानसभा अधिवेशनात कठोर प्रश्न विचारले असते, म्हणून त्यांना दूर ठेवले.” Sanjay Raut

If you can’t bring the cover of money, don’t run the government! Sanjay Raut’s anger at the government