विशेष प्रतिनिधी
बारामती : Ajit Pawar बारामती बाजार समितीच्या सभेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राैद्रावतार पाहायला मिळेल. पेट्राेल पंपाच्या उधारीच्या मुद्यावरून व्यवस्थापकावर अजित पवार चांगलेच भडकले. मी तुला सांगतोय, मी तुला तुरुंगात टाकेन हा. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी? असे संताप त्यांनी व्यक्त केला.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत अजित पवारांना एक निवेदन देण्यात आले. अनावश्यक कर्मचारी भरती आणि बाजार समितीने दीड कोटी रुपयांचे पेट्रोल उधारीवर दिल्याचा मुद्दा मांडलेला होता. या निवेदनातील पेट्रोल पंप उधारीबद्दलचा मुद्दा वाचल्यानंतर अजित पवारांचा पारा चढला. ते वाचल्यानंतर अजित पवारांना राग अनावर झाला आणि त्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले. तू उधार कशाला देतो? अजित पवार अधिकाऱ्याला म्हणाले, बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी रुपये झाली आहे. Ajit Pawar
संतापलेले अजित पवार म्हणाले, तू कशाला उधार देतो? “त्यानंतर अजित पवारांचा पारा चढला. ते म्हणाले, मी तुला जेलमध्ये टाकेन हा. मी तुला सांगतोय. विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तरी द्यायचं नाही. विश्वास किंवा कुणी चेअरमन असेल… हा काय चाललाय बावळटपणा? दीड कोटी, कुणाला दिलं पेट्रोल, डिझेल? ह्या नालायकांनी दीड कोटींचं पेट्रोल…आयला येडी आहेत की, काय रे ही. म्हणजे मी वरून पैसे आणायचे आणि ह्या नालायकांनी दीड-दीड कोटींचं पेट्रोल-डिझेल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी?”, अशा शब्दात अजित पवारांनी सगळ्यांना झापले.
अजित पवार म्हणाले, माझ्याही बापाची नाही आणि तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि हमालांची आहे. किती दिवस झाले? तुम्ही काय करता रे, हजामती करता का इथे. एक महिना नाही. दोन महिना नाही. मी पण पंप चालवतोय. कुणाची उधारी आहे? कुणाची किती उधारी मला सांगा. कुणा-कुणाची उधारी आहे, ते दाखव. मागच्या वेळी खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला. पुढाऱ्यांची उधारी झाली. एकानेही भरली नाही. सर्वसामान्य माणसांसाठी या संस्था काढल्या आहेत. कुणा-कुणाची किती उधारी आहे, ते मला कळलं पाहिजे. माळेगावच्या कारखान्याच्या एमडीला पण सांगा उधारी द्यायचं नाही. Ajit Pawar
Is the Market Committee Your Father’s Property? I’ll Throw You in Jail: Ajit Pawar’s Fiery Outburst in Baramati
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…